Ad imageAd image

RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; महत्त्वाचे मुद्दे

ratnakar
RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; महत्त्वाचे मुद्दे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; महत्त्वाचे मुद्दे

RSS Annual Meeting: ‘भाजपाला निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही’, असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीआधी केले होते. मात्र, लोकसभेत मर्यादित यश मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा संघाशी जुळवून घेण्याचा भाजपाचा कल दिसत आहे. महाराष्ट्रातही विधानसभेआधी संघ आणि भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. तर संघाच्या वार्षिक राष्ट्रीय बैठकीसाठी आता खुद्द जे. पी. नड्डा हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह उपस्थित राहणार आहेत. शनिवारपासून दि. ३१ ऑगस्ट रोजी तीन दिवसांची अखिल भारतीय समन्वयक बैठक केरळमधील पलक्कड येथे होत आहे. या बैठकीला संघ आणि संघ परिवाराशी संबंधित अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोण कोण उपस्थित राहणार?
सरसंघचालक मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे, सर्व सहा सहचिटणीस आणि वरिष्ठ कार्यालयीन पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस शिव प्रकाश आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाकडून काळजीवाहू अध्यक्ष या बैठकीला जाणार असल्याची मध्यंतरी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, जे. पी. नड्डा यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिल्यानंतर ते स्वतः या बैठकीला हजर राहणार आहेत. पुढील वर्षभराचा संघ परिवाराचा कार्यक्रम या बैठकीत ठरविला जाणार आहे.

२ सप्टेंबरपासून भाजपाची राष्ट्रीय पातळीवरची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. तसेच आगामी सहा महिन्यात देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतरच भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यांत विधानसभा निवडणुका यावर्षी किंवा पुढील वर्षी होतील. या राज्यांतील निवडणूक भाजपासाठी सोपी नाही.

दलित मतदार भाजपापासून दूर
काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सामाजिक समरसता अभियान राबवत आहे. जातीमधील दरी कमी करणे आणि हिंदू एकतेचे मापक स्थापन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहेत. मात्र, यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदार हे भाजपापासून दूर गेल्याचे दिसले, ज्यामुळे भाजपाला केवळ 240 जागा मिळविता आल्या. संघातील एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, काँग्रेसने संविधान बदलणार असा अपप्रचार केला, त्याला चोख प्रत्युत्तर देता आले नाही.

जे. पी. नड्डा यांच्या विधानामुळे संघात नाराजी
भाजपा आणि संघात चांगला समन्वय राखण्याची गरज लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे भाजपाचे काम केले नसल्यामुळे निवडणुकीत त्याचा फटका बसल्याचे दिसले. “भाजपा आता स्वयंपूर्ण झाला असून निवडणुकीसाठी संघाची गरज उरलेली नाही”, असे विधान भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले होते, ज्यामुळे संघात नाराजी पसरली होती, असेही या नेत्याने सांगितले.

कोणकोणत्या विषयावर बैठकीत चर्चा होणार?
भाजपा आणि संघातील समन्वयाखेरीज या बैठकीत इतर काही मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचा मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा होईल. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचाराबाबत संघ आणि भाजपाने आधीच चिंता व्यक्त केलेली आहे. तसेच हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेबरोबरही जोडला गेला आहे, असाही मुद्दा संघाने उपस्थित केला होता. याशिवाय समान नागरी संहिता, जातनिहाय जनगणना आणि अनुसूचित जाती-जमातीचे वर्गीकरण या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व विषयांवर भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षांचे आपापसात मतभेद आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article