Ad imageAd image

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ३ डिसेंबर रोजी दीक्षांत समारंभ!

ratnakar
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ३ डिसेंबर रोजी दीक्षांत समारंभ!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभांगण, ज्ञान संगम, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यालय, येथे आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गहलोत हे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील.

यासह कर्नाटक सरकारचे उच्च शिक्षण विभाग मंत्री, चन्नम्मा विद्यापीठाचे सह-कुलगुरू डॉ. एम. सी. सुधाकर हे प्रमुख अतिथी म्हणून तर प्रमुख वक्ते म्हणून यु, एन. आहार आणि कृषी संस्था, निट्टे विद्यापीठ, मंगळुरुचे माजी सल्लागार डॉ. इड्या करुणासागर हे उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती कुलपती प्रा. सी. एम. त्यागराज, कुलसचिव संतोष कामगौडा, महसूल अधिकारी श्रीमती एम.ए सपना, मूल्यांकन कुलपती प्रा. रवींद्रनाथ एन कदम यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article