Ad imageAd image

सैन्यात भरती होण्याचं स्वप्न बाळगून विविध राज्यांतील हजारो तरुण बेळगावमध्ये दाखल

ratnakar
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न बाळगून विविध राज्यांतील हजारो तरुण बेळगावमध्ये दाखल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सैन्यात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण खडतर प्रवास करत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल 310 जागांसाठी 9 राज्यांतील उमेदवारांनी येथील सीपीएड् मैदानाजवळ भरती प्रक्रियेत भाग घेतला आहे. परंतु, बेळगावमध्ये राहण्यासाठी आणि खाण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे या तरुणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी आसरा घेणारे हे तरुण शहरात जागा शोधताना दिसत आहेत.

रेल्वे स्थानकावर आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ तरुणांची मोठी गर्दी होत आहे. प्रादेशिक सेनेच्या वतीने 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही भरती प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
पाच वर्षांनंतर प्रथमच प्रादेशिक सेनेकडून बेळगावमध्ये अशी भरती प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे अनेक तरुण सरकारी नोकरीची संधी साधण्यासाठी उत्सुक आहेत.
भरती मैदानाजवळच राहिल्यास सकाळी लवकर पोहोचणे सोपे जाईल, या विचाराने कॅम्प परिसरातच तरुणांनी तंबू ठोकले आहेत. परंतु, पिण्याचे पाणी, शौचालय, आणि खाण्याची व्यवस्था या ठिकाणी तुटपुंजी असल्यामुळे तरुणांची मोठी गैरसोय होत आहे.

हॉटेलमधील वाढीव दरामुळे तरुणांना महागड्या दराने खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत. सामाजिक संघटनांनी काही ठिकाणी अल्पोपाहार आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असले तरीही सैन्यभरतीसाठी आलेल्या तरुणांच्या अडचणी कायम आहेत.
सैन्यभरतीसाठी येणाऱ्या तरुणांचे नेहमीच असे हाल होताना दिसून येतात. मात्र या तरुणांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे हे लक्षात घेणेही महत्वाचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article