Ad imageAd image

भारतातील YouTube यूजर्संना झटका! प्रीमियम प्लॅन्स महागले; नवे दर काय? जाणून घ्या!

ratnakar
भारतातील YouTube यूजर्संना झटका! प्रीमियम प्लॅन्स महागले; नवे दर काय? जाणून घ्या!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YouTube ने भारतातील कोट्यवधी यूजर्सना चांगलाच मोठा झटका दिलाय. युट्यूबने भारतातील सर्व स्तरांवरील प्रीमियम मेंबरशीपसाठी सबस्क्रिप्शन (YouTube Premium plan) दरात वाढ केली आहे. Google ने काही प्लॅन्सवरील दरात ५८ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. विद्यार्थी, वैयक्तिक आणि फॅमिली प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत आणि नवीन किमती आधीच लागू आहेत.
YouTube ने विद्यमान यूजर्संना दर वाढीबाबत ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. जेथे यूजर्संनी सबस्क्रिप्शन सुरू ठेवण्यासाठी नवीन दरांना सहमती देणे आवश्यक आहे. “आम्ही हा निर्णय सहजपणे घेतलेला नाही आणि हे अपडेट आम्हाला प्रीमियम आणि सपोर्ट सुधारणे सुरू ठेवण्यास अनुमती देईल आणि तुम्ही YouTube वर पाहत असलेल्या creators आणि artists ना सपोर्ट करा.” असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

YouTube Premium plans चे नवे दर काय आहेत?

YouTube Premium चा मासिक स्टुडंट प्लॅन 12.6टक्क्यांच्या वाढीसह 79 रुपयांवरून 89 रुपयांवर पोहोचला आहे. तर वैयक्तिक मासिक प्लॅन 15 टक्क्यांच्या वाढीसह 129 वरून 149 रुपयांवर नेण्यात आला आहे.

फॅमिली प्लॅन महागला :

मासिक फॅमिल प्लॅन 189 रुपयांवरून 299 रुपयांपर्यंत वाढला आहे. हा 58 टक्क्यांनी महागला आहे. तसेच हा प्लॅन सिंगल सबस्क्रिप्शनवर 5 मेंबर्सपर्यंत YouTube Premium वापरण्याची परवानगी देतो.

नवे दर कोणाला लागू?

वैयक्तिक महिना, तिमाही आणि वार्षिक प्रीपेड प्लॅन्सही महागले आहेत. ज्यांची किंमत आता अनुक्रमे 159 रुपये, 459 रुपये आणि 1490 रुपये एवढी असेल. या नवीन किमती नवीन सबस्क्रायबर्स आणि विद्यमान प्रीमियम यूजर्संना लागू आहेत.

YouTube Premium : तुम्हाला फ्री कसे मिळेल?

जे आधीच YouTube Premium चे मेंबर आहेत ते कंपनीच्या मोफत योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक YouTube किंवा Google अकाऊंट असल्यास तुम्हाला विनामूल्य ३ महिन्याच्या मेंबरशीप ऑफरसह एक बॅनर दिसेल. ही ऑफर YouTube Premium शी कधीही लिंक न केलेल्या अकाऊंट्ससाठी दृश्यमान आहे.

YouTube Premium म्हणजे काय?

YouTube Premium ही Google द्वारे पुरवण्यात येत असलेली सेवा आहे. ती तुम्हाला ॲड-फ्री व्हिडिओ पाहू देते. तसेच तुम्हाला YouTube म्युझिक ॲप वापरण्याचीही मूभा मिळते. या सेवेद्वारे तुम्हाला YouTube वर उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे संगीत ऐकण्याचा आनंद घेता येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article