बेळगाव : आपल्या जांबोटी ग्रामपंचायत सर्व शेतकरी वर्ग तसेच सामान्य कुटुंबातील सर्वांनाच मी कळवितो की, ग्रामपंचायत व एग्रीकल्चर यांच्या सहाय्याने रोजगार हमी योजने मधून अनेक शेतकऱ्यांना गाई म्हशी तसेच शेळीपालन यासाठी गोटा निर्मिती करायची असेल अशा शेतकऱ्यांच्यासाठी सहाय्यधन म्हणून जवळपास 50 हजार पर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत 20% रोजगार लोकांच्या नावे तसेच वस्तू रुपात, स्टील, सिमेंट, खडी, वाळू, सप्लाय बिल म्हणून 80 टक्के अशी योजना चालू आहे जर कुणा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खुल्या जागेचा उतारा व शेतकऱ्याचे नाव द्यायचे आहे या शेतकऱ्याच्या नावानं सर्वप्रथमता ऑनलाईन अप्लिकेशन घालून याला मंजुरी घेण्यात येईल त्यानंतर त्या जागेचा फोटो सहित ऑनलाइन जिओ टॅगिंग झाल्यानंतर हा गोटा उभारायचा आहे आधी जर कोणी गोटा उभा केला असेल अशा जुन्या कामावर त्यांना पेमेंट करता येणार नाही कारण हे पेमेंट आहे यासाठी त्यांनी नवीनच गोठा उभारणी करायची असेल तरच अर्ज करावा याच पद्धतीने शेतामध्ये कुणाला जर विहीर बांधायचे असेल अथवा शेती तलाव, कृषी व्हंडा निर्माण करायचे असेल.. पडीक जर शेती असेल माळरानावर शेती गादे बसवायचे असतील तर त्याला सुद्धा रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारची माणसे लावून ती सपाटी करण्यासाठी रोजगारची माणसे उपलब्ध करून देण्यात येतील .. या सर्व योजनेला कोणतीही मशनरी जेसीबी, ट्रॅक्टर यांचा वापर करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि वस्तू रुपामध्ये जितके काम असेल तितकेच इंजिनीयरच्या मोजमापनुसार त्याचे पेमेंट होईल काम कमी असेल तर पेमेंट कमी होईल गोट्याची लांबी रुंदी कमी असेल तर त्याचे पेमेंट कमी होईल विहिरीची खोली/ लांबी/ रुंदी/ कमी असेल तर त्याचे सुद्धा पेमेंट कमी होईल जमिनीचे सपाटीकरण करून शेती बांध तयार करायचे असतील तर त्याचे सुद्धा मोजमापनुसार पेमेंट होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी मी जांबोटी ग्रामपंचायत सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो..
तसेच जवळपास हे आपलिकेशन घालण्याची मुदत कमी आहे यामुळे आपणास यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे ठरवून सोमवारी आपणास कोणती योजना योग्य वाटते याचा विचार विनिमय करून आपण जांबोटी ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधून आपण आपल्या अर्जाची पूर्तता करावी ही विनंती
-आपला हितचिंतक
सुनील देसाई ग्रामपंचायत उपाध्यक्ष जांबोटी