Ad imageAd image

‘अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, तर महाराष्टातील सगळे भिकारी येथे जमा होतात…’ सुजय विखे असे का म्हणाले?

ratnakar
‘अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, तर महाराष्टातील सगळे भिकारी येथे जमा होतात…’ सुजय विखे असे का म्हणाले?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहिल्यानगर : ‘शिर्डी’ येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना मोफत जेवण देण्यात येते. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात आणि तेथील प्रसादसाचा उपभोग भाविक घेत असतात. तरी ‘शिर्डी’ येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करावे. त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. यातून वाचलेला पैसा मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी खर्च करावा,’ अशी सूचना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. या मागणीसाठी आपण ग्रामस्थांना सोबत घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही सुजय विखे म्हणाले.

शिर्डी परिक्रमा उपक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित एका कार्यक्रमात विखे बोलत होते. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, इतर अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विखे यांच्या या मागणीला उपस्थितांपैकी अनेकांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. मात्र, अध्यात्मिक क्षेत्रातील काहींनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

शिर्डी संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळासंबंधी बोलताना विखे यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘शिर्डी संस्थानतर्फे मोफत जेवण दिले जाते. अख्खा देश येथे येऊन मोफत जेवण करतो. महाराष्ट्रातील भिकारीही येथे जमा झाले आहेत. खरे तर शिर्डीला येणाऱ्यांना 25 रुपये देऊन जेवण करणे परवडणारे आहे. त्यानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घ्यावा. वाचलेला हा पैसा शिक्षणासाठी खर्च करा. या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या भविष्याची तयारी करून घेता आली पाहिजे. केवळ शाळांच्या इमारती चांगल्या बांधून जमणार नाही. तेथे चांगले शिक्षक आणण्यासाठी खर्च करा. इंग्रजीचे शिक्षक जर मराठीतून इंग्रजी विषय शिकवित असतील तर काय उपयोग? जे पैसे अन्नदानासाठी खर्च होतात ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. तुम्ही निर्णय घ्या, कोणी या विरोधात आंदोलन केले तर त्यांचे काय करायचे ते पाहू. आपण लवकरच यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेऊ,’ असेही विखे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘येथे शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. भाविकांना मोफत प्रसाद वाटपास विरोध करणे आणि त्यांना भिकारी म्हणने दुर्दैवी आहे.’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article