Ad imageAd image

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न वाचा मंत्र्यांची यादी!

ratnakar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न वाचा मंत्र्यांची यादी!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

List of  Ministers in Maharashtra 2024: नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं  अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला 235 जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र 49 जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी 12 दिवसांनंतर म्हणजेच 5 डिसेंबरला झाला. यानंतर आज (दि. 15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत झाला. नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली.

अखेर! अनेक चर्चा-बैठकांनंतर झाला देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी!
या 12 दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरेच तर्क-वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? यावरून बराच काथ्याकूट झाला. अखेर 5 डिसेंबरला शपथविधीला अवघे 2 तास उरले असताना एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि 5.30वाजता आझाद मैदानावर तिघांचा शपथविधी पार पडला.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्री पदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळालं?
अखेर या सर्व चर्चांच्या फेऱ्यांनंतर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला होता त्यानुसार हा मंत्रीमंडळ विस्तार येत्या 15 डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात होतं. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे आता कुणाला कोणतं खातं मिळणार? या चर्चांवर पडदा पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी
क्रमांक पक्षमंत्र्यांचं नावजबाबदारी/खातं
1.भाजपा -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
2.शिवसेना- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
3.राष्ट्रवादी -अजित पवार उपमुख्यमंत्री
4.भाजपा-चंद्रकांत पाटील निर्णय प्रलंबित
5.भाजपा-मंगलप्रभात लोढा निर्णय प्रलंबित
6.भाजपा-राधाकृष्ण विखे पाटील निर्णय प्रलंबित
7.भाजपा-पंकजा मुंडे निर्णय प्रलंबित
8.भाजपा-गणेश नाईक निर्णय प्रलंबित
9.भाजपा-चंद्रशेखर बावनकुळे निर्णय प्रलंबित
10.भाजपा-आशिष शेलार निर्णय प्रलंबित
11.भाजपा-अतुल सावे निर्णय प्रलंबित
12.भाजपा-संजय सावकारे निर्णय प्रलंबित
13.भाजपा-अशोक उईके निर्णय प्रलंबित
14.भाजपा-आकाश फुंडकर निर्णय प्रलंबित
15.भाजपा-माधुरी मिसाळ निर्णय प्रलंबित
16.भाजपा-जयकुमार गोरे निर्णय प्रलंबित
17.भाजपा-मेघना बोर्डीकर निर्णय प्रलंबित
18.भाजपा-पंकज भोयर निर्णय प्रलंबित
19.भाजपा-शिवेंद्रराजे भोसले निर्णय प्रलंबित
20.भाजपा-नितेश राणे निर्णय प्रलंबित
21.शिवसेना-दादा भूसे निर्णय प्रलंबित
22.शिवसेना-गुलाबराव पाटील
निर्णय प्रलंबित
23.शिवसेना-संजय राठोड निर्णय प्रलंबित
24.शिवसेना-उदय सांमत निर्णय प्रलंबित
25.शिवसेना-शंभूराज देसाई निर्णय प्रलंबित
26.शिवसेना-प्रताप सरनाईक निर्णय प्रलंबित
24.शिवसेना-योगश कदम निर्णय प्रलंबित
28.शिवसेना-आशिष जैस्वाल निर्णय प्रलंबित
29.शिवसेनाभरत गोगावले निर्णय प्रलंबित
30.शिवसेनाप्रकाश आबिटकर निर्णय प्रलंबित
31.शिवसेना-संजय शिरसाट निर्णय प्रलंबित
32.राष्ट्रवादी काँग्रेस- हसन मुश्रीफ निर्णय प्रलंबित
33.राष्ट्रवादी काँग्रेस -आदिती तटकरे निर्णय प्रलंबित
34.राष्ट्रवादी काँग्रेस- धनंजय मुंडे निर्णय प्रलंबित
35.राष्ट्रवादी काँग्रेस-दत्तमामा भरणेनिर्णय प्रलंबित
राष्ट्रवादी काँग्रेस -बाबासाहेब पाटील निर्णय प्रलंबित
37.राष्ट्रवादी काँग्रेसन-रहरी झिरवाळ निर्णय प्रलंबित
38.राष्ट्रवादी काँग्रेस-मकरंद पाटील निर्णय प्रलंबित
39.राष्ट्रवादी काँग्रेस-इंद्रनील नाईक निर्णय प्रलंबित

एकूण 39 मंत्र्यांचं मंत्रीमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे कोणत्या अतिरिक्त खात्यांचा पदभार सोपवला जाणार, याविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article