क्यूआर कोड प्रणाली म्हणजे काय ? आणि ती कशी काम करते ?
नवी दिल्ली : आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक वेळ अशी होती की, क्वचितच कोणी ऑनलाईन पेमेंट वापरायचे. शिवाय मोठ्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट वापरले जायचे. पण आता अगदी एक रुपयाचे ऑनलाईन व्यवहारदेखील केले जाऊ शकते. पण आता यासंदर्भात असा प्रश्न उपस्थित झाला की, सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, असे जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड आहेत, मग पैसे कसे त्यांच्या खात्यातच जातात? याचे उत्तर असे की, सारखे दिसणारे क्यूआर कोड एका खास पॅटर्नवर बनवले जातात. बहुतेक कोडमध्ये काळ्या आणि पांढर्या पट्ट्या असतात. हे कोड फक्त सॉफ्टवेअरद्वारे समजू शकतात.
QR कोड कसा तयार होतो?
जेव्हा जेव्हा एखादी कंपनी एखाद्या वापरकर्त्याला क्यूआर कोड देते, तेव्हा त्याची सर्व माहिती सॉफ्टवेअर दरम्यान त्या क्यूआर कोडशी जोडली जाते. यामुळे जेव्हा कोणतेही पेमेंट दुसर्या व्यक्तीला पाठवावे लागते, तेव्हा ते त्याच खात्यातून जाते ज्याला ते जोडलेले आहे. त्याचप्रमाणे, पेमेंट प्राप्त करण्यासाठी, सर्व माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध आहे. कंपनी हे सर्व सॉफ्टवेअरद्वारे करते.
सर्व क्यूआर कोडसारखे दिसतात का?
याचे उत्तर नाही आहे. ते त्याच्या डिझाईनमुळे आपल्याला सारखे दिसू शकतात, पण ते सारखे नाही. जेव्हा तुम्ही क्यूआर कोड काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की, त्याचा नमुना इतर क्यूआर कोडपेक्षा वेगळा आहे. क्यूआर कोड बनवणारी कंपनी हे आधीच चेक करते की, त्यांनी जनरेट केलेला क्यूआर एका व्यक्तीशिवाय दुसर्या कोणालाही जाणार नाही. कोरोनाच्या काळात देश डिजिटल युगाकडे वळला , आता सर्वच लोक कोणत्याही व्यवहारासाठी ऑनलाईन ऑप्शन स्वीकारतात. कारण, यामुळे आपल्याला खर्चाचा ट्रॅक राहतो, शिवाय सुट्या पैशांची चिंता नाही आणि सोबत पैसे घेऊन जाण्याचाही प्रश्न नाही. फोन सोबत असला की, काम झाले सोपे. बहुतांश ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे क्यूआर कोड स्कॅन करून केले जातात. पैसे पाठवणारा आपल्या फोनमध्ये समोरील क्यूआर कोड स्कॅन करतो, पैसे पाठवतो आणि ते पैसे त्या क्यूआर कोडशी संलग्न बँक खात्यात वळते होतात.