Ad imageAd image

महाराष्ट्र विधानसाभा निवडणुकीत महायुतीची लाट! विरोधी पक्षनेताही नसणार? नियम काय सांगतो?

ratnakar
महाराष्ट्र विधानसाभा निवडणुकीत महायुतीची लाट! विरोधी पक्षनेताही नसणार? नियम काय सांगतो?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MaharashtraAssemblyElection News 2024:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट आहे हे आजच्या  निकालाने स्पष्ट केलं आहे. कारण २०० हून अधिक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर निवडून आलेत. तर महाविकास आघाडीला आत्ताच्या कलांनुसार अवघ्या 54 जागांवर आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीने आमच्या 180 जागा येतील असं वक्तव्य केलं होतं. मात्र निवडणुकीच्या निकालात पूर्णपणे वेगळं चित्र पाहण्यास मिळतं आहे. महाविकास आघाडीत असलेले तीन पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) या तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला आत्तापर्यंत 28 ही आमदार संख्या पार करता आलेली नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेताही नसेल अशा चर्चा होत आहेत. काय सांगतो याबाबतचा नियम आपण जाणून घेऊ.

सध्याचं चित्र काय सांगत?
सध्या जे कल आणि आघाडी पिछाडी कळते आहे त्यानुसार महायुतीचे 229 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार 54 ठिकाणी आघाडीवर आहेत. ज्यामध्ये काँग्रेस 21, शिवसेना (उद्धव ठाकरे) 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) 12 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. त्यातली सत्तास्थापनेची मॅजिक फिगर 145 आहे. ही संख्या महायुतीने सहज गाठली आहे. मात्र २०२४ ते २०२९ या पाच वर्षांच्या कालावधीत विधानसभेला विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्हं आहेत. नियम काय आहे ते आपण जाणून घेऊया.

काय आहे विरोधी पक्ष नेत्यासंबंधीचा नियम?
महाराष्ट्रात 288 जागा आहेत, सरकार स्थापनेसाठीची मॅजिक फिगर 145आहे. तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी 288 जागांच्या एक दशांश आमदार पक्षाकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे 288 च्या एक दशांश आमदार म्हणजेच 28 आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. मात्र तसं चित्र तिन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. जर विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर 28 आमदार असणं गरजेचं आहे. मात्र ही संख्या महाविकास आघाडीतला पक्ष आत्ता तरी गाठताना दिसत नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्हं आहेत.

महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 31जागा मिळाल्या होत्या. तर, महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. महायुती साधारणपणे 220 जागा मिळवत यशस्वी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं हे मी उत्तम लक्षण मानतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आमदारांचाही आम्ही सन्मान करु त्यांचा जो योग्य सल्ला असेल तो आम्ही ऐकू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article