मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते. बुधवारी तिथे ते मृतावस्थेत सापडले असून आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित ‘तमस’ या दुरदर्शनवरील कार्यक्रमद्वारे यांच्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ख्याती झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित हम दिल दे चुके सनम, लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.
गेल्या काही दिवसापासून नितीन देसाई यांचे एन. डी. स्टुडिओत वास्तव्य होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड हादरले आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००५ मध्ये त्यांनी कर्जत येथे ५२ एकरमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. त्यांनी रिअॅलिटी शो बिग बॉस होस्ट केले होते. मराठीत ही ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी त्यांनी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणुन ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच प्रजास्ताक दिन ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ प्रदर्शनही त्यांनीच केले होते, त्यासाठी महाराष्ट्रा ला प्रथम क्रमांक मिळाला होता.
नितीन देसाई यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. ते या आठवड्यात ५८ वर्षात पदार्पण करणार होते. पण वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांनी आपले जीवन संपवले आहे. दोन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतरांसह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते.