बेंगळुरू : विधान परिषदेची जागा निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिली जात नसून धनदांडग्यांना दिली जात असल्याने काँग्रेस कार्यकर्ते वैतागले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्ते पक्षनेत्यांच्या भूमिकेविरोधात ताकद दाखविणार असून केपीसीसी कार्यालयात बैठक घेणार आहेत. एमआर सीताराम, उमाश्री आणि सुधाम दास यांना परिषदेच्या सदस्यपदी जागा देण्यास कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.