बेळगाव- मार्कंडेय नगर, एपीएमसी समोर येथील निवासी मलिकार्जुन सत्तीगिरी यांच्या स्वप्नात सातत्याने दर्शन दिलेल्या आणि कुडाळ जवळील जंगलात सापडलेल्या द्विभुज स्वयंभूवरद सिद्धीविनायक मंदिराची प्रतिष्ठापना मार्कंडेय नगरात 2018 साली करण्यात आली असून तेथे यंदा सहा डिसेंबर रोजी महालक्ष्मी महा सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कळसा रोहन होणार आहे.
या मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दोन ते सहा डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी मंगलवाद्यासहित पूर्ण कलश मिरवणूक संगमेश्वरनगर एपीएमसीजवळील संगमेश्वर मंदिरापासून वरद सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. 3 ते 5 डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी साडेसात वाजता महाआरती आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतील.
6 डिसेंबर रोजी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर सरस्वती, महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे कळसा रोहन परमपूज्य म. नि. प्र.गुरुसीद्ध महास्वामीजी कारंजी मठ बेळगाव यांच्या हस्ते होईल. त्याच दिवशी दुपारी महाप्रसाद होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक कल्याणासाठी मल्लिकार्जुन सत्तीगिरी यांनी 21 दिवसाच्या उपवासाचे व्रत ठेवले आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.