पंचायत राजा अभियांत्रिकी विभागाकडून बेळगाव ग्रामीणमधील सारथी नगर येथील ड्रेनेज कामासाठी 28 लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात करण्यात आली
त्यानंतर, मस्ती नगरातील सांडपाणी बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (एससीपीटीएसपी) एकूण 27 लाख रुपये अनुदान मंजूर करून देऊन काम सुरू करण्यात आले.
त्याचप्रमाणे कुद्रेमानी गावातील नाईकवाडी गल्ली येथेसुध्दा पंचायत राज अभियांत्रिकी विभागाकडून 22 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून काँक्रीट रस्त्याचे कामही चालु करण्यात आले आहे.
मुस्ताक मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य सतीश चेतना आगसगेकर, मनोजा हित्तलमणी, विनायक पाटील, अरुणा देवण आदींसह संबंधित भागातील रहिवासी उपस्थित होते.