spot_img
24.9 C
Belagavi
Tuesday, May 30, 2023
spot_img
spot_img

खात्यावर पैसे नसतील तरी करता येणार UPI

मुंबई : MPC (Monitory Policy Committee) च्या झालेल्या बैठकीत रेपो रेट न वाढवण्याचा निर्णय जसा बहुमताने घेतला गेला. तसाच एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यावर अजूनही काम चालू असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

RBI लवकरच क्रेडिट लाईन सुविधा UPI मध्ये आणत असून त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल याशिवाय बँकांनाही फायदा होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. RuPay Credit Card ला UPI शी जोडण्याची परवानगी देण्यात आली असून आता तुम्ही क्रेडिट लाईनचा वापर करून खात्यावर पैसे नसतील तरीसुद्धा पेमेंट करू शकणार आहात. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डसारखंच इथेही व्याज भरावं लागणार आहे. मात्र ते किती आणि कशा स्वरुपात असेल याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून UPI ​द्वारे पैसे देतात. काही apps आधीच ही रक्कम वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. हे पेमेंट देखील केवळ बँक ठेवीद्वारे केले जाते. RBI च्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर, ग्राहक त्यांच्या बँक ठेवींमधून तसेच पूर्व-मंजूर क्रेडिट्समधून UPI ​​पेमेंट करू शकतील.

सोप्या भाषेत समजण्यासाठी

UPI नेटवर्कद्वारे, ग्राहक पेमेंटसाठी बँकांनी दिलेले क्रेडिट देखील वापरू शकतील. थोडक्यात काय तर क्रेडिट कार्डसारखी ही सुविधा असणार आहे. तुम्ही आधी पेमेंट करायचं आणि नंतर बँक खात्यावरून पैसे वजा केले जाणार आहेत. यामुळे बँकांच्या ऑफरिंग कॉस्टमध्ये घट होईल आणि बँकांसोबत क्रेडिट उत्पादनांच्या नाविन्यपूर्ण पद्धतीतही मदत होईल. यावर RBI स्वतंत्रपणे तपशीलवार माहिती देखील जारी करेल. UPI वरील क्रेडिट लाइन सुविधेमुळे ग्राहकांसाठी point-off- purchase अनुभव अधिक चांगला आणि सुलभ होईल. यासोबतच त्यांना कोणत्याही प्रकारच्या पेमेंटमध्ये क्रेडिट वापरण्याची सुविधाही मिळणार आहे.

UPI द्वारे क्रेडिट लाईन करणार म्हणजे नक्की काय होणार?

डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर म्हणाले की, यामुळे क्रेडिट कार्डची संख्या कमी करून लोकांना UPI द्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. UPI द्वारे ग्राहक बँकेच्या क्रेडिट लाइनचा वापर करू शकतील. क्रेडिट लाइन ग्राहकाच्या बँक खात्याशी लिंक केली जाईल आणि आता खरेदी करा व नंतर पे(BNPL) शी लिंक केलेली आहे.

क्रेडिट लाईन म्हणजे नक्की काय?

क्रेडिट लाइन ही पूर्वनिर्धारित रक्कम असते जी बँक किंवा क्रेडिट युनियन सारख्या वित्तीय संस्थेने तुम्हाला कर्ज देण्यास सहमती दिली आहे. आवश्यक असल्यास, तुम्हाला क्रेडिट लाइनमधून कमीत कमी रकमेपर्यंत पैसे काढण्याची परवानगी आहे. या दरम्यान, कर्ज घेतलेल्या रकमेवर व्याज देखील भरावे लागते.

Related News

अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान

बेळगाव : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती विजय झाला असून सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.सिद्धरमय्या यांच्या...

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केलाबेळगाव : स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img