बेळगाव : केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी बेळगाव येथील ईएसआय रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली.
मंत्री शोभा करंदलाजे यांनी बेळगावी शहरातील अशोक नगर येथील ईएसआय रुग्णालयाला भेट देऊन विभागप्रमुखांकडून सर्व माहिती घेतली.
तसेच नोंदणी केंद्र, संगणक कक्ष, आपत्कालीन विभाग, ओपीडी, अस्थी व सांधे विभागाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आ.अभय पाटील, माजी आ. अनिल बेनके उपस्थित होते .