ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी “X” दिसेल. मस्कला “X” नावाचे “सुपर ॲप” तयार करायचे आहे, जे चीनच्या WeChat सारखे आहे.
X.com वर गेल्यास Twitter उघडेल. इलॉन मस्क आणि ट्विटर सीईओ लिंडा याकारिनो यांचे प्रोफाइल बॅज देखील बदलले आहेत. बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले आहे.
ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं होतं. यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं.
लिंडा याकारिनोने ट्विटरवर तिच्या एका पोस्टद्वारे ट्विटरचा नवीन लोगो शेअर केला आहे. Twitter चा लोगो बदलण्यासाठी फक्त 24 तास लागले, दोन दिवस अगोदर मस्कने त्याच्या 149 दशलक्ष फॉलोअर्सना X लोगो सुचवण्यासाठी आमंत्रित केले, त्यानंतर डिझाईनपैकी एक निवडून त्याचा नवीन प्रोफाइल फोटो बनवला.
ट्विटरचा नवा लोगो देखील ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात दिसला. सीईओ लिंडा याकारिनो यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे.
ट्विटरवरील नवीन बदलांमुळे यूजर्सना पहिल्यांदाच अनेक नवीन गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट सारखे काम देखील केले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कंपनी ट्विटर म्हणजेच X मध्ये सुधारणा करेल. इन्स्टाग्रामच्या नवीन ऑप थ्रेड्ससोबत ही स्पर्धा असणार आहे.