देशभरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि हा दिवस दुर्गा देवीच्या कुष्मांडा रूपाला समर्पित असतो.
या दिवशी माता कुष्मांडाची विधीपूर्वक पूजा केली जाते. आठ भुजा असलेली माता कुष्मांडा भक्तांची सर्व संकटे दूर करते अशी मान्यता आहे. आजच्या दिवशी देवीची विधीवत पूजा केल्याने देवीचा आशिर्वाद प्राप्त होतो.