spot_img
spot_img
spot_img
29.1 C
Belagavi
Friday, December 1, 2023
spot_img
spot_img

शिवसेना केस : शिंदे-फडणवीस सरकार राहणार : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा मात्र अद्याप निकाली राहिला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.

त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. पण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img