Ad imageAd image

भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! नाशिकचा वाद मिटवला, पडळकरांनाही तिकीट

ratnakar
भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! नाशिकचा वाद मिटवला, पडळकरांनाही तिकीट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra BJP 2nd Candidate List For Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राम भदाणे यांना धुळे ग्रामीण मधून तर श्याम खोडे यांना वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत देशमुखांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

याआधी भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील सर्व २२ उमेदवारांची नावे
क्रमतदारसंघउमेदवाराचं नाव
1धुळे ग्रामीणराम भदाणे
2मलकापूरचैनसुख संचेती
3अकोटप्रकाश भारसाकळे
4अकोला पश्चिमविजय अग्रवाल
5वाशिमश्याम खोडे
6मेळघाडकेवलराम काळे
7गडचिरोलीमिलिंद नरोटे
8राजुरादेवराम भोंगळे
9ब्रह्मपुरीकृष्णलाल सहारे
10वरोराकरण संजय देवतळे
11नाशिक मध्यदेवयानी फरांदे
12विक्रमगडहरिश्चंद्र भोये
13उल्हासनगरकुमार ऐलानी
14पेणरावींद्र पाटील
15खडकवासलाभीमराव तपकीर
16पुणे छावणीसुनील कांबळे
17कसबा पेठहेमंत रासणे
18लातूर ग्रामीणरमेश कराड
19सोलापूर शहर मध्यदेवेंद्र कोठे
20पंढरपूरसमाधान औताडे
21शिराळासत्यजीत देशमुख
22जतगोपीचंद पडळकर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article