बेळगाव अरण्यविभागातील खानापूर तालुक्यातील करंबळ ग्रामपंचायत भागातील अरण्यप्रदेशात बगीचा वनखाता मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संदर्भात बगीच्यासाठी श्रमदान केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. श्रमदान केलेले ACF S.S. निगांनी , RFO बसवराज वाळद, निवृत्त ACF C.B. पाटील या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी वरुण देवाने हजेरी लावून आलेल्या अतिथ्याचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले खानापूर आमदार डॉ. अंजली निंबाळकर, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. लक्ष्मी प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष नारायण पाटील, वन खात्याचे अधिकारी मंजूनाथ चव्हाण.
( C.C.F. बेळगावी circle)
D.F.O. हर्षा बानू , ACF संतोष चव्हाण, RFO कविता इरेनटी, करंबळ ग्रामपंचायत सदस्य उदय नारायण भोसले, PDO S.A. माधरी, आणि वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.