बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु आजतागायत निवडून आलेल्या कोणत्याही सदस्यला अजूनही त्यांची पदे स्विकारू दिलेली नाहीत. त्यांना अजूनही महानगरपालिकेच्या बाहेर ठेवलेले आहे. महानगर पालिकेत एकही सभासद नसताना बजेट चे नियोजन करण्यात येत आहे. ही अक्षरशः लोकशाही ची हत्या आहे. इतर विविध कारणांमुळे नगरपालिकेच्या निवडणूक अडीच वर्षे लांबल्या आहेत.
सभासद निवडून येऊनही त्यांचा शपथविधी अजूनही झालेला नाही, शहराचा सर्वांगीण विकास ठप्प झालेला आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या नियुक्ती शिवाय अर्थसंकल्प जाहीर करणे हे नियमाला डावलून आहे. म्हणून आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, सर्वप्रथम महापौर आणि उपमहापौर यांची नियुक्ती करून नंतर च बजेट सादर करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.