बेळगाव : छावणी परिषद व्याप्तीतील विकास म्हणावा तसा झाला नाही छावणी परिषद बेळगाव आर्थिक स्थिती गंभीर असल्याने विकास होत नसल्याच्या कारणाने या भागामध्ये येत्या काळात विकास कसा साधता येईल यासाठी ब्रिगेडियर जयदीप कुमारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी उत्तरचे आमदार असिफ शेठ खासदार मंगला अंगडी सह छावणी परेशीय सीईओ इतर सदस्य उपस्थित होते. प्रामुख्याने छावणी परिषद व्याप्तीतील पिण्याच्या पाण्याची समस्या रास्ता गटर व इतर मूलभूत सुविधा पूर्णत्वाला नेण्यासाठी म्हणून राज्य सरकारने महानगरपालिकेकडे छावणी परिषद विकासासाठी हस्तांतर करण्याचा आदेश दिल्याने या बैठकीमध्ये प्रामुख्याने विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी राज्य सभा सदस्यांनी बोलताना सांगितले की केंद्र सरकारने यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिली होता, पण गेल्या दोन-चार वर्षांमध्ये आर्थिक स्थिती छावणी परिषदेची म्हणावी तशी नसल्याचे कारण नेमके काय असावे याबद्दल मी चर्चा करू याव्यतिरिक्त राज्य सरकारने छावणी परिषद विकास करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी इराण्णा कडाडी यांनी पत्रकाराची सांगितले. बेळगाव हे सीमा भागातील केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी छावणी परिषद व्याप्ती ही मोठी आहे अशा या विभागाचा सर्वांगीण विकास होणे सध्या काळाची गरज आहे असे असताना छावणी परिषदची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकास ठप्प झाला आहे या दृष्टिकोनातून यानंतरचा कारभार महानगरपालिका हाताळणार आहे निश्चित येत्या काळात छावणी परिषद विकास होणार की नाही याकडे मात्र साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.