बेळगावी : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वप्न महत्वकांक्षी योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. बेळगावपासून नजीक असलेल्या राजहंसगड येथे उभारण्यात आलेला देशात सर्वात मोठे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अनावरनाचा मुहूर्त ठरला आहे.
4 व 5 मार्च रोजी दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राजहंसगड किल्ल्यावर सण उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. दि 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता 50 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते , माजी मुख्यमंत्री सिध्दरामया, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी के शिवकुमार, शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री , विद्यमान विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील, लोकसभा सदस्य व सिने अभिनेता डॉ अमोल कोल्हे , लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
60 फूट उंचीचा इलेक्ट्रीक ध्वजस्तंभ देखील याप्रसंगी उदघाटन केला जाणार आहे. राजहंसगड किल्ला सजविण्यात आला असून नवे महाद्वार, किल्लाद्वार निर्माण केले आहे. किल्ला आवारात असलेले सिद्धेश्वर मंदिराचा आकर्षक जीर्णोद्धार केला आहे.
4 मार्च रोजी विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात होणार असून , 2 दिवस मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.
बेळगावच्या इतिहासात विशेष लेजर शो, क्रॅकर शो देखील होणार आहे. पालखी उत्सव, पोवाडा, ढोल ताशा नृत्य, मर्दानी खेळ आदी पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
ऐतिहासिक राजहंसगड किल्ला सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे. तेथे भव्य शिवाजी महाराजांची पुतळा उभारावा असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. ते आता भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होते आहे.