खानापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेला सिद्धरामय्या सरकारमुळे दिलासा मिळाला .
काल बेंगलोर येथे झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट मिटींग मधे कस्तुरीरंगन अहवाल फेटाळला यामुळे खानापूर तालुक्यातील जंगल भागातील जनतेला दिलासा मिळाला असून आता कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही. मग ते बैलूर, देवाचीहट्ची हबनहट्टी किंवा मान हुळंद असो किंवा हेमडगा कोंगळा गवाळी देगाव असो, जंगल भागातील लोकांना आता आपली भाषा, संस्कृती, टिकविता येणार आहे.
लक्षात ठेवा कॉंग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या भल्यासाठी काम करत असतो. गोर गरीब जनतेसाठी काम करत असतो….. म्हणूनच कस्तुरीरंगन अहवाल फेटाळला तसेच गोर गरीब जनतेसाठी पंचहमी योजना पण राज्य सरकारने चालू ठेवल्या आहेत याचा तालुक्यातील गोर गरीब जनतेस लाभ होतोय.
आता जंगलभागातील लोकांनी निवांत आपले जीवन जगावे.
आता राहीला विषय या भागातील रस्ते व पूल मुलभूत सुविधा संदर्भात …
यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेंटणे गरजेचे आह. आमदार खासदार साहेबांनी हे काम करावे म्हणजे जंगल भागातील जनतेस याचा फायदा होईल….
कॉंग्रेस सरकारने आपले काम केले आहे कस्तुरीरंगन अहवाल फेटाळला आहे. आता या जंगल भागातील लोकांच्या मुलभूत गरजा भागविणे रस्ते पूल करणे हे खासदार साहेबांनी करावे त्यांचे सरकार केंद्रात आहे म्हणून आम्ही असे म्हणतोय.