खानापूर : अस्वल हल्ला प्रकरण ताईंनी सरकार दरबारी लावून धरलें.
ताईंच्या सुचने नुसार खानापूर ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष घाडी यांनी जखमी पेशंट ची दवाखान्यात जाऊन भेट घेतली थोडीपार मदत केली. तसेच खानापूर वनअधिकार्यांना सुद्धा गावडे यांना मदत करण्यासंदर्भात अल्टीमेटम दिला.
कॉंग्रेस सरकारने आज अस्वल हल्ला प्रकरणातील सखाराम महादेव गावकर यांच्या पत्नीकडे वनमंत्री यांनी स्वता १० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्त केला. यावेळी केपीसीसी सदस्य महादेव कोळी, ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मानतेश राऊत, जांबोटी भागातील ताईंचे कट्टर कार्यकर्ते दिपक कवठनकर तसेच वनअधिकारी उपस्थित होते.
आज पर्यंतच्या कधीही एवढी मोठी रक्कम सरकारने नुकसान भरपाई म्हणून दिली गेली नव्हती परंतु कॉंग्रेस पक्ष अथवा सिद्धरामय्या सरकार गोर गरीब जनतेसोबत आहे हे आज दिसून आले.
आम्ही पुन्हा सांगतो खानापूर कॉंग्रेस ने जर एखादा विषय हातात घेतला तर तो शेवटपर्यत तड़ीस नेण्याचे कार्य खानापूर कॉंग्रेस करते हे आज पुन्हा सिद्ध झाले. मानच्या लोकांनी किती ही आमचा विरोध केला, तरीही कॉंग्रेस पक्ष नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन गोर गरीबांच्या मदतीसाठी उभा रहातो. आज आम्हास कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून अभिमान आहे आम्ही मान च्या पेशंटला सरकार कडून मदत मिळवून देण्यास यशस्वी ठरलो.
वनमंत्री सन्माननीय खंडरे साहेबांचे आभार:
तसेच एसीएफ निंबरगी व तमाम वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे पण आज मान प्रकरणात आम्ही जाहीर अभिनंदन करतो. ताईंनी हे प्रकरण लावून धरले त्याबद्द्ल खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे ताईंचे पण आभार मानतो.