Telegram चा वापर करणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या इंस्टंट मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर भारत सरकार बंदी घालू शकतं. कारण सध्या सरकारद्वारे टेलीग्रामची चौकशी सुरु आहे. सरकारला शंका आहे की या अॅपचा वापर खंडणी आणि जुगार सारख्या बेकायदेशीर हालचालींसाठी केला जात आहे. जर एखादं अॅप अश्या कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामांसाठी वापरलं जात असेल तर भारतात त्यावर बंदी घातली जाऊ शकते. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं आहे.
भारतात Telegram वर बंदी?
मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकार मेसेजिंग अॅप Telegram ची चौकशी करत आहे, कारण सरकारला शंका आहे की या अॅपचा वापर खंडणी आणि जुगार सारख्या बेकायदेशीर कामांसाठी केला जात आहे. या चौकशीच्या आधारावर या अॅपवर बंदी घातली जाऊ शतके. ही चौकशी गृह मंत्रालय (MHA) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतगर्त भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) करत आहे.
रिपोर्टनुसार भारत सरकार Peer-To-Peer (P2P) कम्युनिकेशन केंद्रस्थानी ठेऊन चौकशी करणार आहे. या तपासात बेकायदेशीर कामांची चौकशी होईल. याच्या रिपोर्टनंतर निर्णय घेतला जाईल.
CEO ला अटक
टेलीग्रामचे फाउंडर आणि CEO Pavel Durov यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आली असून त्यानंतरच ही माहिती समोर आली. Pavel यांना 24 ऑगस्टला पॅरिस मध्ये त्यांच्या अॅपमधील मॉडरेशन पॉलिसीमुळे अटक करण्यात आली होती. प्लॅटफॉर्मचा गुन्हेगारीसाठी होत असलेला वापर रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे ही अटक केल्याचं सांगितलं जात आहे. Elon Musk आणि Edward Snowden यांनी पावेल यांना पाठिंबा दिला आहे.
अॅपवरून UGC-NEET पेपरची विक्री
गेल्या काही टेलीग्रामच्या माध्यमातून सायबर क्राइमच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अलीकडेच यूजीसी-नीट वादाच्या वेळी देखील टेलीग्राम चर्चेचा विषय ठरला आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेचे पेपर लीक झाले होते आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर शेयर करण्यात आले होते. यावरून भारतातही Telegram ॲप बंद होणाची शक्यता आहे.