बेळगाव : मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील तर उपाध्यक्षपदी आर आय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष ना शुभेच्छा देत म्हणाले की यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये जास्तीन जास्त उसाचे गाळप करावे यासाठी नवीन निवड झालेल्या व इतर सदस्यांनी मिळून एकजुटीने प्रामाणिक काम करावे आणि शेतकऱ्याच्या हित दृष्टिकोनातून साखर कारखाना चालवावा असे म्हणत शुभेच्छा दिल्या.
यावेळी तानाजी पाटील यांनीही साखर कारखाना चालवण्याचे जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडू असे ते म्हणाले ,तर उपाध्यक्ष आर आय पाटील यांनीही सर्वांच्या सहकार्यातून येत्या पाच वर्षांमध्ये उत्तम कार्य करून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्यासाठी आपण सर्व सदस्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभाऊ असेही ते म्हणाले.
यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सुनील अष्टेकर सह इतर सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तर बाहेर येताच कंग्राळी ग्रामपंचायत व सोसायटीच्या वतीने ही पुष्पहार पण करून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष चे अभिनंदन करण्यात आले यावेळी उपस्थित जनसमुदायांनी सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष ना शुभेच्छा दिल्या.