spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
20.4 C
Belagavi
Sunday, September 24, 2023
spot_img
spot_img

समाजाचे रक्षण करणारा हा क्षत्रिय असतो : स्वामी मंजुनाथ भारती

सकल मराठा समाज म्हणजे आपण क्षत्रिय समाज म्हणू शकतो. समाजाचे रक्षण करणारा हा क्षत्रिय असतो, क्षत्रिय समाज म्हणजे ज्यांच्याकडे शौर्य, बल, औदार्य, त्याग वीरता, दया , क्षमा,ही यांच्याकडे आहे , , कृष्ण क्षत्रिय होता, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे देखील क्षत्रिय होते. त्यांच्याकडे पाहताना आपण आदर्श धर्म रक्षक म्हणून पाहतो मराठा समाजाचा स्वामी कोणत्याही समाजाचा स्वामी असो त्याला समान मानतो.

कारण आमच्या समाजाला जी शिकवण मिळाली आहे , ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वर , तुकाराम, नामदेव, रामदास, यासारख्या साक्षात्कारी संतांची शिकवण आहे , हे साक्षात्कारी संत भारतातच झालेले आहेत. भारतीय संस्कृती जगामध्ये महान मानली जाते . संस्कृतीचे जतन जो समाज करू शकतो तोच समाज सर्वात मोठा बनू शकतो, आमच्या राजाने इतरांचा मान ठेवावा हेच शिकवले आहे.

बेळगाव नगरीचा इतिहास शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणून पहावा लागेल, या ठिकाणी होणारी शिवजयंती जगातील कोणत्याही ठिकाणी होत नाही. असे सकल मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ म्हणाले. रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगाव येथे आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात बोलत होते , छत्रपती शिवाजी महाराज उद्यापासून गुरुवंदना शोभायात्रेची सुरवात झाली .

शोभा यात्रेमध्ये मुख्य रथात श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यानंतर बाकीच्या स्वामींना देखील अशाच पदतीने रथातून गुरुवंदना सभामंडपा पयंत आणण्यात आले, शोभा यात्रेमध्ये ढोल ताशा, भजनी मंडळ, अश्वमेघ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हत्तीवर बसून मिरवणूक ,लाठी प्रात्यक्षिक, अशी आकर्षित मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीमध्ये संयोजक किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर, गुणवंत पाटील , महादेव परील, जयराज हलगेकर संजय कडोलकर आमदार अनिल बेनके खानापूर चे आमदार अंजली निंबाळकर , कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यासह सकल मराठा समाजाचे अनेक नेते व महिला मंडळ व समाज बांधव या शोभायात्रेमध्ये मोठ्या उत्साहात भाग घेतल्याचे पाहायला मिळाले.

ठिकाणी पाण्याची व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम बांधवांनी देखील या गुरुवंदना कार्यक्रमाला सहकार्य म्हणून नाथ पै सर्कल येथे पिण्याच्या पाण्याची ची व्यवस्था केली होती, याप्रमाणे जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी महिलांच्या वतीने 5000 लोकांना कोकम सरबत तसेच उप्पीटचे वाटत करण्यात आले . नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जायंट्स सखीने या प्रसंगीसुद्धा सामाजिक बांधिलकी जपली.या प्रसंगी सखी च्या अध्यक्षा चंद्रा चोपडे उपाध्यक्षा विद्या, सरनोबत, अर्पणा पाटील ,नम्रता महागांवकर,निता पाटील, ज्योती अनगोळकर, सुलक्षणा शिन्नोळकर, वृषाली मोरे, वैशाली भातकांडे, अर्चना कंग्राळकर, दिपा मुतकेकर, सविता मोरे, भाग्यश्री पवार, रेणू भोसले सह इतरांनीही शोभा यात्रेला सहकार्य केले , यानंतर सभा मंडपात गुरुवंदना कार्यक्रम पार पडला, यावेळी संयोजक किरण जाधव , रमाकांत कोडूसकर , आमदार अंजली निंबाळकर, आमदार अनिल बेनके , यांनीही विचार मांडले, यानंतर सकल मराठा समाजाचे सदगुरु मंजुनाथ स्वामीजींचे आशीर्वचंन भाषण पार पडले , सकाळी 11 : 30 पासून महाप्रसादाचे सुरवात केली होती, जवळ पास चाळीस हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, एकूणच समाज्याला एकत्रीत करण्याची पहिलीच वेळ होती, याला यश आले , पण येथेच थांबून चालणार नाही या पुढचे कार्य ही तितकेच महत्वाचे आहे, असे यावेळी बोलले जात होते.

Related News

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

शिमोगा : जुन्या भांडणाची पार्श्‍वभूमी दोन गटात झालेल्या भांडणात शिमोगा येथील द्रौपदम्मा सर्कल येथे रात्री उशिरा झालेल्या भांडणात 5 जणांना भोसकले. पवन आणि किरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img