Ad imageAd image

सुरेश धस पुन्हा बोलले, टार्गेटवर मुंड दादांना विनंती केलेली, ‘त्या’ दोघांपैकी एकाला मंत्री करा!

ratnakar
सुरेश धस पुन्हा बोलले, टार्गेटवर मुंड दादांना विनंती केलेली, ‘त्या’ दोघांपैकी एकाला मंत्री करा!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परभणी : अजित पवार यांना मी विनंती केली होती की माझ्या पक्षाकडून मला मंत्री होण्याची संधी मिळत नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसत आहे. तुम्ही तरी तुमच्या पक्षाकडून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्री करावे. ते पाचव्या टर्मचे आमदार आहेत. अन्यथा पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांना तरी मंत्री करावे. जर या दोघांनाही करायचे नसेल तर बुलढाण्याच्या कायांदे यांना करा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही म्हणणं नाही, राजेश विटेकर तुम्ही अजितदादांकडे जा आणि परभणी जिल्हा बिनामंत्र्यांचा राहू द्या, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.

स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी परभणी येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार सुरेश धस बोलत होते. पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, हत्या कोणी घडवून आणली त्याच्या पाठीमागे कोण मास्टरमाइंड आहे हे पाहण्यासाठी बारामती होऊन परभणी, परळीला माणसे पाठवा. आमच्या इतर लोकांना परळी वाल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे कळेल. परळीत इतर समाज जीव मोठी धरून बसला आहे. 200-300 कुटुंब शहर सोडून अन्य शहरात जात आहेत.

बोगस पिक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरला आहे. राजेश विटेकर तुमच्या सोनपेठ एकट्या तालुक्यात २३ हजार हेक्टर वर परळी वाल्यांनी बोगस पिक विमा भरला आहे. बाजूच्या लातूर धाराशिव नांदेड यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील हा बोगस पिक विमा भरण्यात आला आहे. हा बोगस पिक विमा भरण्याचे षडयंत्र परळी मधूनच करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस पिक विमा भरणारे, पिक विमा भरण्यासाठी आधार कार्ड आणि कागदपत्रे देणारे या सर्वांवर मोका लावला पाहिजे असेही आमदार सुरेश धस म्हणाले.

स्वर्गीय संतोष देशमुख याला मारहाण करतानाचा व्हिडिओ आकाने पाहिलाच असेल. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांना मारहाण करून मारण्यात आले. हा व्हिडिओ आकाच्या आकाने देखील पाहिलाच असेल आणि जर तो पाहिला असेल तर आकाच्या आकालाही जेलमध्ये जावे लागणार. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असे सुरेश धस म्हणाले. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना का मंत्रिमंडळात घेतले, असा सवाल उपस्थित करत संगीत डिगोळेपासून संतोष देशमुखपर्यंत किती जणांच्या हत्या केल्या आणि कोणी हे उद्योग केले याचा हिशोब घ्या, आणि चौकशी करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article