बेळगाव :शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे.
बीम्स कॅम्पसमधील सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची आज आमदार बेनेके,बीम्सचे संचालक ए.बी.पाटील यांच्यासह कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि ही माहिती दिली .
तसेच यावेळी त्यांनी बेळगावात सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले . याचे बांधकाम 2018 मध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र कोरोना तसेच लॉकडाऊन यामुळे रुग्णालयाचे बांधकाम मंदावले होते . मात्र आता काम पूर्णत्वास आल्याचे सांगितले .
सदर रुग्णालयाची इमारत चार मजल्यापर्यंत बांधली जात आहे. एका मजल्यावर चार तर हॉस्पिटलमध्ये आठ विभाग बांधण्यात आले आहेत . पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि इंडो क्रोनोलॉजी विभाग असणार आहे .तर तिसऱ्या मजल्यावर व्हीआयपी रोम, जनरल रूम, तर चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर्स असतील.
तसेच सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चार महिन्यांत पूर्ण होईल. कंत्राटदार आणि अभियंता यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले. मुदतीत काम लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.
आईचे ,मुलांचे रुग्णालय डिलिव्हरी वॉर्ड , ट्रॉमा सेंटर आणि नर्सिंग कॉलेजही येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहे. संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हे रुग्णालय मोफत असेल, असेही ते म्हणाले.तसेच “रुग्णालयाच्या उदघाट्ना करीता देशाच्या पंतप्रधानांना बोलवण्याचा मानस असल्याचेही सांगितले.