spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
20.4 C
Belagavi
Sunday, September 24, 2023
spot_img
spot_img

जागतिक जल दिन निमित्त विशेष

“थेंबे थेंबे तळे साचे” असे म्हणतात ते काही खोटे नाही. आज जागतिक जल दिन, पण खरंच हा दिवस एका दिवसापूरता मर्यादित आहे का? हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे कारण फक्त एक दिवस पाणी वाचवायचे आणि वर्षाचे इतर दिवस सगळे सारखेच असे करून चालणार नाही कारण पाणी हे सर्व सजीव सृष्टी साठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वी वर पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘जल है तो जीवन है’ असे म्हणतात.
आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.

जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटनुसार जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सतत विकास लक्ष्य 6: 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता” हे साध्य करण्यासाठी समर्थन करणे आहे. हा दिवस जगाला पाणी वाचविणे किती गरजेचे आहे, ते आपले मूळ स्त्रोत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा संदेश सांगणे हा मुळ उद्देश आहे.
असे जरी असले तरी प्रत्येक मनुष्याने जल दिन हा एक दिवसा पुरता मर्यादित न ठेवता रोज पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे कटाक्षाने स्वतःवर काही नियम घालून घेतले पाहिजेत. साध्याची परिस्थिती बघता पृथ्वीचा समतोल हा ढासळला आहे आणि आपणच त्याला जबाबदार आहोत.

पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !
तहान लागल्यावर विहीर खणू म्हटल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-
० पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
० पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
० जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
० पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.
साधी असली तरीही अत्यंत महत्त्वाची कृती आहे.
स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे आणि जमेल तसे इतरांनाही ये महत्त्व पटवून दिले तरी खूप काही साधेल!

Related News

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

शिमोगा : जुन्या भांडणाची पार्श्‍वभूमी दोन गटात झालेल्या भांडणात शिमोगा येथील द्रौपदम्मा सर्कल येथे रात्री उशिरा झालेल्या भांडणात 5 जणांना भोसकले. पवन आणि किरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img