spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

समाजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भात सामाजिक संदेश उत्कृष्ट मराठी कलाकृती ” दडपण” चित्रपट प्रदर्शित

बेळगाव : समाजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भात सामाजिक संदेश देणारा आणि बेळगावच्या कलाकारांच्या अभिनयाची एक उत्कृष्ट मराठी कलाकृती असलेला ” दडपण” चित्रपट आज मोठ्या धडाक्यात प्रदर्शित झाला आहे.

बेळगावचे राजेश गणपती लोहार निर्मित आणि संतोष चंद्रकांत सुतार दिग्दर्शित ‘आता विराम आत्महत्येला’ ही टॅगलाईन असलेला ” दडपण” हा मराठी चित्रपट आज शनिवारपासून शहरातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ढोल व झांज पथकाच्या जल्लोषात हा प्रदर्शन सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फीत कापून दडपण चित्रपटाच्या यावेळी चित्रपटाचे निर्माता राजेश लोहार, दिग्दर्शक संतोष सुतार, अभिनेते शशिकांत नाईक, मुख्य अभिनेत्री निधी राऊळ, सहकलाकार जोत्स्ना पाटील, राधिका पाटील आणि अन्य कलाकारांसह हितचिंतक तसेच प्रेक्षक आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

चित्रपटाच्या प्रदर्शनीय खेळाला हजेरी लावल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, आपल्या बेळगाव शहर परिसरातील निर्माते लेखक दिग्दर्शक आणि कलाकाराने हा चित्रपट व शहर परिसराताल निमात लखक दिग्दर्शक आणि कलाकाराने हा चित्रपट बनविला ही अभिमानास्पद बाब आहे. आज समाजामध्ये आई-वडील किंवा मुलांच्या चुकीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. विशेषतः आत्महत्येसारख्या अनुचित प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने या चित्रपटातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यासाठी मी माझे मित्र या चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार, लेखक – दिग्दर्शक संतोष सुतार यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि कलाकारांचे मी माझी संघटना व शहरातील समस्त माता -पित्यांच्यावतीने आभार मानतो. अलीकडेच शहरातील वडगाव अलीकडेच शहरातील वडगाव भागात एका महिन्यात 4-5 आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

आई-वडील काबाड कष्ट करून मुलांना

शिकवत असतात. आपल्या आई-वडिलांचा आधार बनण्याऐवजी क्षुल्लक कारणावरून मुले आत्महत्या करून आपला बहुमोल जीव गमावतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. ही बाब अत्यंत स्तुत्य असून त्यासाठी निर्माते दिग्दर्शक व कलाकारांचे धन्यवाद

दिग्दर्शक व कलाकारांचे धन्यवाद मानावे तितके कमीच आहेत.

हा चित्रपट सामाजिक संदेश देणारा असल्यामुळे व्यावसायिक गल्लाभरू चित्रपटांप्रमाणे याला प्रचंड गर्दी होणार नसली तरी पालकांसह त्यांच्या मुलांसाठी मार्गदर्शक, बोध देणारा हा चित्रपट आहे हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. यासाठी शहरवासीयांना विशेष करून पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनींना माझी विनंती आहे की त्यांनी “दडपण” हा चित्रपट आवर्जून पहावा, असे आवाहनही रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img