श्रद्धा कपूर-राजकुमार रावच्या ‘ स्त्री-2’ची धूम! बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई : श्रद्धा कपूर-राजकुमार रावच्या ‘स्त्री-2’ने बॉक्स ऑफिसवर 13 दिवसांत शानदार कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 414.55 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 14 दिवसात 500 कोटी पार करेल. (Stree 2)
राजकुमार राव- श्रद्धा कपूरचा चित्रपट स्त्री-2 बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे.
राजकुमार रावने मजेशीर सीनचा केला खुलासा
राजकुमार रावने 27 ऑगस्ट रोजी आपले दोन फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटातील त्याचे काही सीन कट करण्यात आले आहेत. राजकुमारने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की, या चित्रपटातील त्याचे काही आवडते सीन होते पण, दुर्देवाने फायनल एडिटमध्ये ते सीन कट करण्यात आले. आपल्या पोस्टसोबत राजकुमारने विचारलं की, चाहत्यांना हे सीन्स पुन्हा पाहायला आवडतील. राजकुमारने विचारताच कॉमेंट्सची लाईन लागली.
पुन्हा रिलीज होणार स्त्री-2?
राजकुमार रावच्या पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली की, चित्रपट रिएडिट करून काही सीन जोडून चित्रपट पुन्हा रिलीज केला जाईल? सध्या यावर कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.