२६ सप्टेंबरपासून देशभरात नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. आदिशक्तीच्या पूजनाचा हा सोहळा भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो. घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.
नवरात्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जे ०५ऑक्टोबर २०२२ पर्यंत साजरे केले जाईल.
नवरात्रीच्या काळात रंगांना विशेष महत्त्व आहे. सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ, पांढरा रंग.
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.