Seema Haider News Updates: सीमा हैदर ही सध्या भारतातील चर्चेचा विषय ठरली आहे. ती भारतात कशी आली? तीचा भारतात येण्याचा हेतू काय आहे? याचा पोलिस कसून चौकशी करत आहेत. पण युपी एटीएसच्या चौकशी दरम्यान मोठी बातमी बाहेर आली आहे. यावेळी सीमा हैदरने ही महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
युपी एटीएसच्या चौकशी दरम्यान सीमा हैदरने सांगितले की, सचिनच्या आधीही तिने भारतातील अनेक लोकांशी संपर्क साधला होता. तिने ज्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, त्यापैकी बहुतेकजण दिल्ली एनसीआर मधील होते. सीमा हैदर ने एटीएसच्या चौकशीत प्रत्येक प्रश्नाचं अगदी मोजून मापून उत्तर दिली आहेत. चौकशीत तिच्या चेहर्यावर भितीचा अजिबातच भाव नव्हता, असंही समोर आलं आहे.
युपी एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही अतिशय तीक्ष्ण मनाची असून कालच्या चौकशीनंतर सीमाकडून कोणतीही माहिती काढणं सोपं नाही असं एटीएसच मत आहे. तसेच चौकशी दरम्यान सीमा हैदरला काही इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावल्या होत्या, ज्याकी सीमाने अगदी चांगल्या प्रकारे वाचल्या होत्या आणि इंग्रजी उच्चारही बरोबर होते.
यूपी एटीएसने १० तास चोकशी केली….
एटीएसने सीमा हैदरची चौकशी केली असता तिने प्रतिक प्रश्नाला अश्या पद्धतीने उत्तर दिली की, एटीएसला ही आश्चर्य वाटलं. सीमा हैदरची सोमवारी यूपी एटीएसने नोएडाच्या सेक्टर-९४ कार्यालयात तब्बल १० तास चौकशी केली.
सीमा हैदरने पबजी खेळून भारतातील लोकांशी संपर्क साधला…
युपी एटीएसच्या चौकशीत असं आढळून आले की ज्या दिवसांमध्ये सीमाने सचिन मीनाच्या आधी भारतीयांशी जवळीक वाढवली होती, तेव्हा पब-जी गेम खेळताना तिचा त्यांच्याशी संपर्क आला होता. मात्र, हे लोक कोण आहेत? याची माहिती सध्या फक्त यूपी एटीएसकडे आहे. येत्या काही दिवसांत एटीएस या लोकांचा शोध घेऊन त्यांची चौकशीही करेल अशी शक्यता आहे.