spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

सीमा हैदरचे दिवस फिरले, प्रकरण ATS कडे, थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी

लखनऊ : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचीच सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर दरदिवशी तिच्याबद्दल नवनवीन खुलासे होत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या ATS ने सीमा हैदर प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सीमा हैदर पाकिस्तानातून दुबईला गेली. तिथून नेपाळमार्गे प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी भारतात दाखल झाली. सीमाने हा प्रवास कसा केला? त्याचा तपास यूपी ATS ने सुरु केला आहे.
पाकिस्तान ते भारत यात्रे दरम्यान सीमा कोणा-कोणासोबत बोलली? तिने किती जणांना फोन केले? याचा एटीएस अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. ATS सीमाच्या कुटुंबाची पार्श्वभूमी शोधून काढण्याच्या मागे लागली आहे.

सोशल मीडियावर सीमा हैदरबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. यात ती पाकिस्तानी हेर असल्याचा बोललं जातय. अनेक जण सीमा हैदरच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत होते.

  • सीमा हैदर विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. नोएड पोलीस सीमाच्या जामीन अर्जाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या सूचनेनंतर नोएडा पोलीस सर्तक झाले आहेत. सीमा हैदर सध्या जिथे राहतेय, तिथे साध्या कपड्यातील पोलीस तैनात आहेत. सीमा फरार होऊ शकते, असं पोलिसांना वाटतं. पोलीस सीमाच्या जामिनाविरोधात कोर्टात याचिका दाखल करु शकतात.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img