संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश:
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे प्रस्तावित केले आहे.
केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, मी 11 नोव्हेंबर रोजी पद सोडत असल्याने न्यायमूर्ती खन्ना त्यांचे उत्तराधिकारी असतील.
सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश होतील.
त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.