परशुराम धाकलू पाटील वय वर्ष ७९ यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते कंगराल गल्ली चे सरपंच होते तसेच माजी कॉर्पोरेटोर आणि वरिष्ठ नेताही होते. त्यासोबतच उत्तम व्यावसायिक ही होते.
फादर ऑफ बीसीनेसमन’ या नावाने त्यांची ख्याती होती तसेच सद्या ते ऑटोमोबाईल मेरचन्ट्स असोसिएशन बेळगावी च्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते.अश्या या हरहुन्नरी व्यक्तीच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या अनुयायांनी एक उत्तम नेता गमावला आहे.
अश्या या अष्टपैलू व्यक्तिमतत्वाच्या अंत्यसंस्काराला विनायक नगर येथे सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आणि सदाशिव नगर स्मशानभूमीत त्यांना मुखाग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगी- जावई, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.