बेळगाव तालुक्यातील बाकनुर येथील अंगणवाडी चे दोन रूम बांधून सहा महिनेच झाले आहेत, तरी याच इमारतीच्या छताला गळती लागली आहे.
अंगणवाडीत खाली पाणी पडल्याने शाळेतील मुलांना बसवायचे कुठे असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर केलेले काम असल्याने जर उद्या मुलांना काही धोका झालाच तर याला जबाबदार कोण असेल?