नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सूरत कोर्टानं मोदी आडनाव टिपण्णीवरुन दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही मोठी बातमी आहे. न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
सुप्रीम कोर्टानं राहूल गांधी यांना अधिक शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहेत, त्यांना कमी शिक्षा देखील केली जाऊ शकते असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या मतदार संघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना 23 मार्चला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांच लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं म्हणून राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले असता त्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांची पहिली प्रतिकिया
‘नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद’ अशी प्रितिक्रिया सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर दिली आहे.
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टात तरी न्याय जिवंत आहे, न्याय मेलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे.