Ad imageAd image

बेळगावात ‘राजमाता जिजाऊ’ जयंती उत्साहात साजरी

ratnakar
बेळगावात ‘राजमाता जिजाऊ’ जयंती उत्साहात साजरी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने काल “राजमाता जिजाऊ” यांची जयंती शहरातील आंबेडकर उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर दलित संघर्ष समितीचे राज्य संघटना संघटक सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. असेच आदर्श शिक्षक धनाजी कांबळे यांचा 85 वा जन्मदिन साजरा करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा समितीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत जो अपमान केला. त्या विरोधात चलो बेंगलोरची हाक देण्यात आली. गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 मिनिटांनी फ्रीडम पार्क बेंगलोर येथे भव्य असे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

बेंगलोर येथील होणाऱ्या आंदोलनाकरिता दलित संघर्ष समिती आंबेडकरवादचे राज्य संघटक सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने बेळगाव जिल्ह्यातून दलित बांधव बेंगलोरला 22 रोजी रवाना होणार आहेत.

आंदोलनातून गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डोके टेकून माफी मागावी. तसेच ज्या व्यक्तींना संविधान मान्य नाही त्यांनी भारत सोडून द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्ष महांतेश तलवार, मनोहर रजांकट्टी, नागेश कामशट्टी, सागर कोलकर,आर.जी.कांबळे, राम चव्हाण, संतोष कांबळे, अशोक कांबळे,सुरेश शिंगे, दीपक सुंटकी, बैरू मैत्री, दीपक धबाडे, कल्लाप्पा नाईक, बी एल भांडारकर, शेखर ऐंवर, सिद्दू कुरंगी, फकिरा कुरंगी ,पिराजी कुरी,जीवन कुरणे,धनाजी कांबळे उपस्थित होते.

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article