मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. अजूनही काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आंबोली घाटामध्ये रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दरड कोसळली आहे. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर ही दरड कोसळली. घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हाताने दरड हटवतानाचे चित्र आहे. जेसीबी किंवा कोणतीही यंत्रणेचा दरड हटवण्यासाठी वापर केला गेला नाही. कोसळलेली दरड 11 ते 12 तास होऊन गेले तरी अद्याप बाजूला करण्यात आलेली नाही.
मानोरा परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथून वाहणाऱ्या खोराडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या काठावर असलेल्या तालुक्यात बेलोरा येथे नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले. लाखो रुपयांचे सामान, वस्तू पुरात गेले. तसेच नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी मुंगसीराम उपाध्ये आणि सचिन उपाध्ये यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. पिके वाहून गेली. लाखो रुपयांचे पिकं जमीनदोस्त झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली.