Ad imageAd image

सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील आमदार भीमराव आण्णा तपकीर यांना निवेदन सादर

ratnakar
सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील आमदार भीमराव आण्णा तपकीर यांना निवेदन सादर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव आण्णा तपकीर उपस्थित होते, त्यावेळी त्यांना सीमाप्रश्नाबाबत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पुणेस्थित सहकारी वैराळ सुळकर,प्रमोद गुरव,श्रीधर पाटील,स्वप्नील पाटील,किशोर पाटील व इतर सदस्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री यांच्या तर्फे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सीमाप्रश्न मांडून चर्चिला जावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके व युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांची भीमराव आण्णा तपकीर यांच्याशी सीमा प्रश्नाबाबत फोनवर चर्चा झाली.

आमदारांनी सीमाप्रश्नी लक्ष देण्याचे आश्वासन यावेळी दिले. यासाठी खानापूर मित्रमंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा, विद्यमान अध्यक्ष विजय पाटील,बेळगाव फौंडेशन चे अध्यक्ष दत्ताराम भेकणे व इतर सदस्यांचे सहकार्य लाभले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article