spot_img
spot_img
spot_img
29.1 C
Belagavi
Friday, December 1, 2023
spot_img
spot_img

बेळगावातील जनता डबल इंजिन सरकारला पाठींबा देणार – स्मृती इराणी

कोरोना काळामध्ये देश संकटात सापडलेला असताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून दिली. मायमाऊलींना डोक्यावर हंडा घेऊन वणवण करावी लागू नये, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरात पाणी देण्याची योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जातेय.

प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तींना चांगले जीवन जगता येण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या. आपला एक भाऊ प्रत्येक अडचणीत पाठीमागे खंबीरपणे उभा राहत असल्याने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महिला भगिनी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. नागेश मनोळकर यांना विजयी करतील, असा विश्वास केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे.

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भव्य सभा घेत महिलांना मार्गदर्शन केलं. पुढे बोलताना इराणी म्हणाल्या, कर्नाटक राज्यातील जनता टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना कदापी मतदान करणार नाही. तर शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मागे नक्कीच राहील. बेळगावमधील महिलांना कुणाला मतदान करायचे हे माहीत आहे. गेली ७० वर्षात लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येत नव्हते, हे पुढील उमेदवार कधी सांगणार नाहीत. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जलजीवन योजनेच्या माध्यमातून घराघरांमध्ये पाणी पोहचवले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यामुळे आगामी काळात देखील बेळगाव सह संपूर्ण कर्नाटक राज्याच्या विकासासाठी जनता डबल इंजिन सरकारला पूर्ण बहुमत येईल, असा विश्वास यावेळी स्मृती इराणी यांनी व्यक्त केला.

यावेळी बेळगाव जिल्हाध्यक्ष मा.आ. संजय पाटील, भाजपा उमेदवार श्री. नागेश मनोळकर, ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री. धनंजय जाधव, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा सेक्रेटरी श्री. किरण जाधव, महिला मोर्चा अध्यक्ष बेळगाव ग्रामीण भाग्यश्री कोकितकर, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक विना विजापुरे, हिंडलगाव ग्रा, माजी अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, एससी मोर्चा ग्रामीण अध्यक्ष मल्लेश कोलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मतदारसंघातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img