सिंगल विकेट स्पर्धा :
केजीबी स्पोर्टस कंग्राळ गल्लीच्या वतीने सरदार मैदानावर 44 वी सिंगल विकेट श्री गणेश ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 64 खेळाडूंनी भाग घेतला होता.
बुधवार ( दि.21) रोजी सकाळी 10 वाजता केजीबी स्पोर्टसचे माजी खेळाडू संघाचे मार्गदर्शक दीपक पवार व कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ मालोजीराव अष्टेकर, शरद पाटील, पकंज पाटील, गंगाधर पाटील, बाबुराव कुट्रे, शंकर बडवाण्णाचे, गोपाळ सांबरेकर, सुरेश गडकरी, अजित कुलकर्णी, अरुण पठाणे, अशोक कंग्राळकर, विनायक निलकंठाचे, सुहास पाटील, गजानन बडवाण्णाचे, अनिल पाटील, सुनिल पाटील, बाबू इंगोले, पवन बडवाण्णाचे, राजू सदरे, ललित कोकीतकर, मनोज ताशीलदार, सुनिल नायडू, राजू केलीगेरी, परशराम तोरे यांच्या उपस्थित उदघाटन झाले.
त्यावेळी उपस्थित खेळाडूंना एस पी कार एक्ससरीज यांच्या वतीने टीशर्टचे वितरण करण्यात आले. त्यानंतर गणेशपूजन करुन खेळपट्टीवर पूजन करण्यात करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी या ट्रॉफीचे इतिहास व महत्व सांगण्यात आले. तसेच सरपंच पी. डी. पाटील, ए . डी. जाधव, केजीबी स्पोर्टचे आधारस्तंभ राजू कागीनकर, भारती गोपाळ सांबरेकर यांना मौन पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वासमोर चिट्या उडवून स्पर्धकांचे खेळाचे सामने नोंद करण्यात आले. तसेच शरद पाटील यांनी सामन्याचे नियम व अटी नमूद केल्या. बक्षीसांचे स्वरुपाबाबत माहिती दिली. उपस्थित पत्रकार, पाहुणे व छायाचित्रकारांचे पुष्प देउन स्वागत करण्यात आले.