बेळगाव : चव्हाट गल्ली येथील जालगर मारुती मंगल कार्यालमध्ये अनिल बेनके फौंडेशन आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बृहत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची सुरुवात आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भारत मातेचे फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराला प्रोत्साहन दिले.
जागतिक डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आमदार अनिल बेनके यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा पुष्प देऊन गौरव केला, तसेच डॉक्टर्स डे च्या त्यांना शुभेच्छा ही दिल्या. आज सकाळ पासून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात झाली असून शिबिरात सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा तसेच दंत तपासणी यासह अनेक आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली.
डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल मधील जेष्ठ डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले असून त्यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषध ही देण्यात आली.
आठवड्याच्या प्रत्येक रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात एकूण 14 ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्तर कर्नाटकचे आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.
– नंदिनी जी.