रक्त दान,महा दान…कोणतेही कार्य असो, एका हाकेला धावून जाणारी संस्था म्हणजे “वन टच फाऊंडेशन” जुना गुडसशेड रोड, बेळगाव यांनी एक हात मदतीचा या सहकार्याच्या भावनेतून रक्तदान करून एका महिलेला जीवनदान दिले आहे.
20/7/2023 रोजी सरकारी बिम्स हॉस्पिटल बेळगाव येथे श्रीमती वनिता एंगीया रा.पापा मळा टिळकवाडी बेळगाव या महिलेच्या ऑपरेशनसाठी अर्जंट A पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती तरी त्या गरीब महिलेने ” वन टच फाऊंडेशन” बेळगाव या संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांना फोन केला आणि आपली सर्व हकिकत सांगितली. तेंव्हा त्यांनी लागलीच संस्थेचे कार्यकर्ते,श्रीनिवास पिसे, रविन्द्र पाटील आणि भरत यांना सोबत घेऊन जाऊन त्या महिलेला 3 बॉटल रक्ताची व्यवस्था करून दिली. ते कार्य पाहून त्या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने सर्वांचे आभार मानले.
त्या महिलेच्या पाश्चात्त्य एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा आहे. तिचे कोणीही नातलग नाहीत. दुसर्यांच्या घरी जाऊन भांडी-धुणी करून आपला उदरनिर्वाह करत असते. हे ऐकूण कार्यकर्ते रविन्द्र पाटील यांनी खर्चासाठी म्हणुन काही रक्कम तिच्या हातात दिली.श्रीनिवास पिसे यांचे आजचे 23 वे रक्तदान होते. त्यांच्या या कार्यातून “रक्तदान करा,जीव वाचवा.” असा संदेश पिसे यांनी दिला.