बेळगाव : केंद्राकडून एक देश, एक निवडणूक या 1प्रस्तावाबाबत हुबळी येथे बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले की, एक देश, एक निवडणूक ही कल्पना चांगली आहे. पण एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. निवडणुका एकदाच घेतल्या तर काही राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ते आमचे सरकार विसर्जित करणार का, असा सवाल शेट्टर यांनी केला.