नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या मुहुर्ताचे औचित्य साधून सुंसदेचे कामकाज जुन्या संसदेतून नवीन संसद भवनात हलवले गेले. पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनात प्रवेश केला आहे. मोदी पायीच संविधानाची प्रत घेऊन नव्या संसदेत पोहोचले. मंगळवारी दुपारी नवीन संसद भवनात कामकाज सुरू झाले. लोकसभेचे विशेष अधिवेशन दुपारी 1.15 वाजता सुरू होऊन राज्यसभेत दुपारी २.१५ वाजेपर्यंत कामकाज सुरू होते.