महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थित अर्ज दाखल करण्यात आला ,
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित चौराशी मंदिर पासून शक्ती प्रदर्शन रॅली ची सुरवात करण्यात आली घोषणा बाजी करत ही रॅली खानापुरातील प्रमुख मार्गातून छत्रपती शिवाजी स्मारकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे
यावेळी ढोल ताशा आणि मराठी भाषिकांचा बुलंद आवाज साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये प्रामुख्याने ढोल ताशा व हातामध्ये घोषणा फलक घेऊन पुन्हा एकदा मराठी भाषिक एकत्र आल्याचा अनुभव या राली दरम्यान येत होता यावेळी नाम पत्र दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले की भाषा आणि संस्कृती होत असलेला
न्याय दूर करण्यासाठी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टात असलेला जिव्हाळ्याचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे म्हणत जनता पूर्वीप्रमाणे एकत्रित आले असून विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले या वेळेला खानापूर महाराष्ट्र केस समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे प्रकाश चव्हाण आबासाहेब दळवी निरंजन सरदेसाई नारायण कापूळकर गोपाळराव पाटील पांडुरंग सावंत दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर श्रीकांत कदम युवा समितीचे केसरकर सह खानापूर तालुक्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेमंडळी यादरम्यान उपस्थित होते.